सागर प्रकाशनचे
साजवार्ता
Page No.: 3
Date: 15/11/2026
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित औषधी गोळ्यांची अवैध विक्री करणाऱ्या रॅकेटचा गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाने पर्दाफाश केला आहे. पंचायत समितीच्या मैदानावर सापळा रचून पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून ११० गोळ्यांसह एकूण १ लाख ७५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुख्य पुरवठादारासह तिघांविरुद्ध सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहेबाज रईस शेख (२४ रा. शताब्दीनगर) आणि शुभम रमेश डेरे (२८ रा. शताब्दीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गोळ्या विकणारा मुख्य आरोपी आवेस फारुख बागवान (रा. शताब्दीनगर) याच्यावरही
गुन्हा नोंदवण्यात आला. काही तरुण नशेच्या गोळ्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती एनडीपीएसच्या पथकाला मिळाल्याने शुक्रवारी (दि. १३) रात्री पथकाने सापळा रचून शाहेबाज शेख आणि शुभम डेरे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे ११० गोळ्या आढळून आल्या. शाहेबाज याने या गोळ्या आवेस बागवान याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, प्रभारी उपायुक्त (गुन्हे) शर्मिष्ठा घारगे वालावलकर, सहायक आयुक्त (गुन्हे) पूनम पाटील, निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन जाधव, उपनिरीक्षक उत्प्रेश्वर मुंडे, सतिष जाधव, देशराज मोरे, विशाल मेटे, नितेश सुंदरडे आदींनी केली.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions












